श्री विरभद्रेश्वर प्रशालेची उज्वल निकालाची परंपरा कायम
शाळेचा 100 टक्के निकाल, विशेष प्राविण्यासह 56 तर प्रथम श्रेणीत 5 विद्यार्थी
औसा प्रतिनिधी
औसा, दि. 17 ः श्री विरभद्रेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, औसा द्वारा संचलित श्री. विरभद्रेश्वर प्रशालेने आपली निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत मार्च/एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10 बोर्ड परीक्षेत शाळेचा 100 टक्के निकाल लागला असुन यामध्ये विशेष प्राविण्यासह 56 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेमधून कु. साळुंके अभिलाषा शशिकांत हिने 99.00 टक्के घेवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
श्री. विरभद्रेश्वर प्रशालेत  कु. बनसोडे ऋतुजा जितेश (95.20), कु. फावडे गायत्री बालाजी (95.20), कु. म्हेत्रे यश बालाजी (94.80) चि. जगदाळे शुभम महादेव (94.60), चि. कंदले आदित्य विलास (93.60), कु. कल्याणी चैताली बस्वराज (93.40), कु. गडेकर ऋतुजा संतोष (92.80) कु. साठे सृष्टी अनिल (92.40) टक्के गुणाने उत्तीर्ण होवून घवघवीत यश मिळविले आहे. यांच्यासह प्रशालेतील 56 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. वैजनाथप्पा इळेकर, सचिव सी. एस. तोडलगे ,उपाध्यक्ष अ‍ॅड. वागदरे एम. बी., कोषाध्यक्ष प्रा. हालकुडे ाय. ए., सहसचिव उटगे एस. के., संचालक जी. एस.औटी सर, उमेश दुरुगकर, मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे सर , श्री कांबळे, हलमडगे,वैद्य, सौ. सिध्दपवार, सौ.कांबळे सौ. मुंजाने , सौ. लोहारे ,सौ. माशाळकर शालगर,सोळूंके, राठोड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचारी यांनी अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments