जिल्हा परिषद प्रशाला बेलकुंड शाळेचा 100% निकाल
28 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण
औसा प्रतिनिधी
एस एस सी परीक्षा मार्च 2022 मध्ये जि. प .प्रशाला बेलकुंड शाळेचा 100%निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. त्यामधे
परीक्षेस प्रविष्ठ 37 विद्यार्थी होते. त्यामधे
28 विद्यार्थी विशेष प्रावीण्य उत्तीर्ण झाले असून
6 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत व
3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामधे प्रथम आरती हनुमंत पवार 96.60%,
द्वितीय — सृष्टी रामेश्वर निर्मळे96.40%, द्वितीय—गायत्री निरंजन स्वामी96.40, तृतीय— गौरी गोविंद वगरे 96% घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे गावचे सरपंच श्री विष्णू भाऊ कोळी, उपसरपंच सचिन पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तपासे, उपाध्यक्ष माधुरी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील व्यंकटराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री शकील शेख, प्रशालेचे मुख्याध्यापक किरण पाटील व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments