भादेकराकडून "गुणवंत पशुवैद्यक"पुरस्कार प्राप्त डॉ मुक्कनवार यांचा सत्कार
औसा प्रतिनिधी
औसा-भादा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पशुधन विकास अधिकारी डॉ शिवानंद मुक्कनवार यांनी त्यांच्या सेवा काळात विशेष कामगिरी केली आहे.
याची दखल महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेऊन त्यांना "गुणवंत पशुवैद्यक" या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे.
यामुळे भादा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शेतकरी दिवाकर चिंचोलकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश लटूरे यांनी आयोजित सन्मान सोहळा भादा येथे शुक्रवार दि २७ मे रोजी सकाळी संपन्न झाला.
0 Comments