भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर येथे प्रंचड आंदोलन
औसा प्रतिनिधी
लातूर शहरातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे,  जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनासह सर्व जनतेला मोफत आरोग्य सेवा उच्च प्रतीची मिळावे यासाठी सुपर स्पेशलिस्ट शासकीय रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर येथे प्रचंड आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्याला फार मोठी राजकीय वारसा आहे तरी परंतु लातूर शहरातील जनतेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा जीवनाशी निगडित असा पाणी प्रश्न मात्र अद्यापि सोडवता आलेला नाही, टंचाई काळात तर देशामध्ये प्रथमच रेल्वेने पाणी अनन्याची नामुष्की लातूरकरावर वडवली.
महाराष्ट्रामध्ये दोन अडीच वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमधील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी लातूरकरासाठी  लवकरात लवकर उजनीचे पाणी  आणू असे आश्वासन दिले. अडीच वर्ष उलटून गेले तरी लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पालकमंत्री देशमुखांना वेळच मिळत नाही कि ,लातूरकर जनतेकडे जाणीवपूर्वक लक्षपूर्वक दुर्लक्ष करतात ते समजत नाही.

उन्हाळा कडक चालू आहे सूर्य आग ओकतोय थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना तरसावं लागत आहे अशा ही परिस्थितीत लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या नागझरी, धनेगाव बंधाऱ्यात पाणी भरपूर शिल्लक असताना लातूरकरांना पाणीपुरवठा करण्यास माननीय अमित देशमुख पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनास अपयश येत आहे. लातूरकरांना पंधरा दिवसाला कसेबसेपाणी मिळत असतानाच गेल्या दहा पंधरा दिवसापासून लातूरकरायचा नळाला जे पाणी येते ते पाणी अतिशय गडूळ ,घाण रंगीत आहे. त्यामुळे लातूरकर हे पाणी पिण्यासाठी भीत आहेत. अनं जे पिले त्यापैकी काही जण आजारी पडले आहेत.हे घाण पाणी न देता आम्हाला शुद्ध व मुबलक पाणी  द्यावे यासाठी लातूरकरांनी महानगरपालिकेकडे घाण, कलर युक्त पाणी बाटली सह तक्रारी केल्या महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनीही संबंधित आयुक्ताकडे तक्रार केले पालकमंत्र्यांकडे निवेदन दिले गेले असे असतानाही जनतेच्या व लोकप्रतिनिधीच्या अर्जाला निवेदनाला पालकमंत्री अमित देशमुख व आयुक्ताने केराची टोपली दाखवली तेव्हा या अशा संवेदनाहीन पालक मंत्री महोदयांच्या कामकाज विरोधामध्ये व  महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नगरसेवकांच्या सहभागातून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे, शहर जिल्हाध्यक्ष मग्गे, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, शैलेश लाहोटी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले सर्व जनतेने आपापल्या घरातील नळाला आलेले घाण पाणी बाटलीमध्ये घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
तात्काळ लातूरकरांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करा, सुपर स्पेशलिस्ट शासकीय दवाखाना चे खाजगीकरण टाळा अन्यथा पालकमंत्री व सत्तेतील मंत्री महोदयांना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी भूमिका आज माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आंदोलन प्रसंगी मांडली.

Post a Comment

0 Comments