बोरगांव (न.)येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
औसा(सा.वा.)दि.५
औसा तालुक्यातील बोरगांव (न.) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटणा घडली आहे.
याबाबत अधिक माहितीअशी की, बोरगांव (न.)येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाने रहात्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयत बलराम काकासाहेब साळुंके (वय 32 रा. बोरगांव न. ता.औसा) यांने बुधवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
याबाबत मयताचा भाऊ बळीराम काकासाहेब साळुंके यांनी फिर्यादी दिल्यावरुन भादा पोलिसात अक्समात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास भादा पोलिस हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments