विमलबाई शृंगारे यांचा
सेवनिवृत्तीबद्दल सत्कार

शिवाजी भातमोडे, खरोसा
वार्ताहर दि. 1 मे 2022

      खरोसा ( ता. औसा ) येथील नवं भारत विद्यालयातील सह शिक्षिका विमलबाई निवृत्ती शृंगारे  या सेवानिवृत्त झाल्याबद्दल रविवारी त्यांना विद्यालयाच्या वतीने उभयतांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर स्वामी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक मनोहर पाटील, संचालक अशोक खरपडे ,प्रकाश लांडगे, तलाठी एम. एम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी किणीकर प्रीती, राऊत आशा, किरवले गायत्री,शेख समीना, धर्मशीला लांडगे, मानसी काशीद,रणजित लांडगे, अर्चना वाघमारे, प्रा. दत्तात्रय सुरवसे, प्रा. तुकाराम कोळपे, बालाजी गवळी, नरशिंग सूर्यवंशी, मनोज मुसाडे, संदीपान नवखंडे,संगीत सूर्यवंशी यांची भाषणे झाली.
       अध्यक्षीय समारोप प्राचार्य परमेश्वर स्वामी यांनी केले.
         प्रास्ताविक महादेव औरादे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी भातमोडे यांनी तर अनिल सुलतानपुरे यांनी आभार मानले.

  मो. 9011339173.

Post a Comment

0 Comments