महावितरणशी निगडीत प्रश्नांचा तसेच  शेतरस्ते व फळबाग लागवड आदि कामांचा आ.अभिमन्यू पवार यांनी घेतली आढावा बैठक..
औसा मुख्तार मणियार
प्रशासकीय इमारत, औसा येथे कृषी, महावितरण, पंचायत समिती व पाणीपुरवठा सह विविध विभागांची बैठक घेतली. औसा मतदार संघात शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामांचा तसेच मनरेगातून  ग्रामसमृद्ध अभियान अंतर्गत सुरू असलेल्या गोठे, शेततळे, सिंचन विहिरी निर्मिती व फळबाग लागवड कामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची इत्यंभूत माहिती कृषी सहाय्यकांना व्हावी यासाठी त्यांची कार्यशाळा आयोजित करावी. तसेच शेतकऱ्यांसाठी मंडळ निहाय कार्यशाळा आयोजित करून फळबाग लागवडीची माहिती द्यावी. तिथेच प्रस्ताव स्वीकारून तिथेच निकषानुसार मंजुरी द्यावी. अशा सूचना कृषी विभागाला देण्यात आले. महावितरणने वाकलेले पोल्स खाली आलेल्या विद्युत तारा आदि दुरुस्तीचे काम पावसापूर्वी करून घ्यावी.अन्यथा दुर्दैवाने कुठे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी सर्वश्री संबंधित शाखा अभियंताची असेल अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी किल्लारी 30 खेडी मातोळा 10 खेडी, खरोसा व लामजना पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला.किल्लारी व मातोळा पाणी पुरवठा योजनांचा वीज बिल भरणा होऊनही वीज कनेक्शन जोडण्यात आलेली नसून वरिष्ठाकडे तसा अहवाल सादर करून संबंधित वीज जोडणी तात्काळ पूर्ववत करण्यात यावी अशा सूचना आमदार अभिमन्यु पवार यांनी दिल्या. यावेळी या बैठकीत औसाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, निलंगाचे उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभाताई जाधव,औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी,निलंगाचे तहसीलदार गणेश जाधव,औसा गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, निलंगाचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, निलंगा कृषी अधिकारी श्रीनिवास काळे, कार्यकारी अभियंता जयंत जाधव, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे, महसूल व कृषी मंडळाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी या आढावा बैठकीत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments