आमदार धिरज भैय्या देशमुख साहेब यांची औस्यातील लोकनेते विलासराव देशमुख चॕम्पियनशीप स्पर्धेला भेट

*बाभळगाव पासून सुरवात झालेली ही स्पर्धा राज्यापर्यंत घेवून जाणार यांचा हा प्रारंभ*

*आमदार धीरज भैया देशमुख साहेब यांचे सूतोवाच*

औसा -लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्ताने आयोजित जिल्हाभरात १० तालुक्यात व लातुर शहर अशा ११ ठिकाणी विलासराव देशमुख चॕम्पियन क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत.धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात किक्रेट स्पर्धा सुरू झाल्याने किक्रेट खेळाडुना मोठा दिलासा मिळाला आहे.मंगळवारी राञी या चॕम्पियन क्रिक्रेट स्पर्धेचे मार्गदर्शक मा धिरजभैय्या देशमुख यांनी औसा येथे स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली.यावेळी मैदानांवर हलकी,ताशे,बॕन्ड,बाज,व फटाक्यांची अतिषबाजी करुन आ.धिरजभैय्या देशमुख यांच्या स्वागत करण्यात आले.
औसा शहर व तालुक्यातील गुणवंत आणि होतकरु खेळाडुना प्रोत्साहन मिळावे म्हणून तालुकास्तवर ग्रामीण टी-टेन टेनिस बॉल स्पर्धेच्या अयोजन करण्यात आले आहे.औसा शहरातील बाबामियॉच्या मैदानावर दिवस-राञ डे-नाईट स्पर्धा चालु आहेत.लातुर ग्रामीणचे आ.धिरजभैय्या देशमुख यांनी औसा  येथे उपस्थित राहुन सामन्यांचा आनंद घेतला. S P Devlopars & F T क्रिकेट संघ व पुष्पा संघ लामजनाच्या  सामन्याचा नाणेफेक त्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.आ.धिरज देशमुख यांच्या उपस्थित मुळे संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरले होते.त्यांनी मैदावर जाऊन मैदानांची पाहणी केली व स्वता पिच वर बॉटिंग करुन खेलाडु ना प्रोत्साहन दिले.व संयोजन समितीला महत्त्वाच्या सुचना केल्या याप्रसंगी आ.धिरज देशमुख यांचे संयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजन केल्याबदल सर्वच संयोजन टीमचे त्यांनी अभिनंदन केले.तालुकास्तरावर सुंदर व नियोजित स्पर्धा होत. असल्याबदल समाधान व्यक्त केले.आ.धिरजभैय्या  देशमुख यांच्या उपस्थित झाल्यामुळे खेळाडुना प्रोत्साहन मिळाले व त्याच्यातील सूप्तगुणांना वाव मिळाला. 
  त्याच परंपरेला पुढे घेऊन जाण्याचे काम लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप च्या ग्रामीण टी 10  स्पर्धेच्या माध्यमातून करायचे असून सध्या मैदानी खेळही मोबाईल स्क्रीनवर खेळले जात आहेत. जे कोणी मैदानावर खेळायचे ते कोरोनामुळे बंद झाले, ही सर्व परिस्थिती बदलून सर्वांना पुन्हा मैदानावर खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी या स्पर्धेचे विलासराव साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून माननीय दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जात आहे. 
मैदानी खेळ हे जुनं ते सोनं आहे. त्याला चालना देण्यासाठी ही स्पर्धा ग्रामीण भागात खेळवली जात आहे. मांजरा परिवाराच्या सौजन्याने ही स्पर्धा सुरु केली आहे. यात लातूर जिल्ह्यातून ४०० संघ सहभागी झाले आहेत. तालुकास्तरावरील सामने झाल्यानंतर मुख्य सामने टाऊन हाॅल येथे होणार आहेत. प्रत्येक गावातील खेळाडू या क्रीडा स्पर्धेत उतरावे, त्यांना प्रोत्साहन मि्ळावे यासाठी ही टी १० स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. लाँग टर्म धोरण ठेवून ग्रामीण टी १० स्पर्धेचे हे पहिले पाऊल आपण टाकत आहोत. या स्पर्धेला राज्य स्तरावर घेऊन जायचे आहे. बाभळगाव पासून याची सुरुवात झाली आहे असे सांगून आगामी काळात  संस्थानी खेळाडू म्हणून टीम  सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे . औसा येथे आयोजित लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेचा  तालुक्यात धुमधडाक्यात सुरू आहे.ग्रामीण भागातुन अनेक संघानी आपले संघ स्पर्धेत उतरवले आहेत.

*आगामी काळात क्रीडा क्षेत्राकडे अधिक लक्ष देवू*

आमदार धीरज विलासराव देशमुख पुढें बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील क्रीडांगणाचा दर्जा यापुढील काळात वाढवायचा आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी चांगले सोयी सुविधा असलेले मैदान लागते. ते निर्माण करण्याचा प्रयत्न करु. केवळ क्रिकेटच नाहीतर हाॅलि्बाॅल, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, खोखो, बाॅक्सिंग असे आऊटडोअर, इनडोअर खेळांना प्रोत्साहन मिळावे, यासाठीही प्रयत्न करु. मुलींनाही यात समान संधी असेल. या ग्रामीण टी १० स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा श्रीपती काकडे माजी चेरमन DCC बैंक, मा श्रीशैल उटगे जिल्हाध्यक्ष कॉग्रेस,मा वियज देशमुख टि २० चे उपध्यक्ष , मा गणपतराव बाजुळगे चेरमन मारुती कारखाना,मा  अभय सांळुके प्रदेश सचिव कॉग्रेस, मा अॅड समद पटेल सदस्य जिल्हा नियोजन समिती, मा प्रविण पाटिल , मा अमर खानापुरे प्रदेश सचिव ,मा मौलाना कलिमुल्लाह प्रदेश सचिव अल्पसंख्यक कॉग्रेस,मा सचिन दाताळ ,मा दत्तोपंत सुर्यवंशी ता अध्यक्ष कॉग्रेस,मा शेख शकिल शहराध्यक्ष कॉग्रेस,मा अंगद कांबळे नगर सेवक,मा गुलाब शेख माजी नगर सेवक,मा सदानंद शेट्टे,मा आदम पठाण,मा राजेंद्र बनसोडे, अॅड दिपक राठोड,मा  अक्रम पठाण,मा अजहर हाशमी, साखर , उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी - मा खुंदमिर मुल्ला शहराध्यक्ष विलासराव युवा मंच,मा रवी पाटिल ता अध्यक्ष विलासराव युवा मंच,मा भागवत म्हेञे,मुजमिल शेख,मा हाजी शेख, मा नियामत लोहारे,मा दिपक राठोड,जयराज कसबे,मा अशिफ लोहारे,मा खाजा शेख, मा मुस्तफा अलुरे,मा मुजम्मिल शेख,मा सुबाहन ,मा रशिद मुंगले,शहारुख शेख,मुक्रम शेख,नियामत अलुरे, खेळाडू संयोजक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.सामन्यांचे धावते संचलन खुंदमिर मुल्ला यांनी केले.

Post a Comment

0 Comments