राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शनात पुजा शेफ प्रथम तर मेघा सूर्यवंशी व्दितीय


दोन दिवशीय हर्बल ड्रग्ज पोस्टर प्रदर्शनात देशातील ८५० विद्यार्थ्यांचा सहभाग


औसा प्रतिनिधी
लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.यात चन्नबसवेश्वर  कॉलेजची विद्यार्थ्यांनी पुजा शेफ हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर महाराष्ट्र कॉलेजच्या मेगा सुर्यवंशी यांनी व्दितीय,अंबिका झरकुंठे यांनी तिसरा क्रमांक मिळवला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले.

हर्बल ड्रग्ज राष्ट्रीयस्तरीय पोस्टर प्रदर्शनात मध्य प्रदेश, राज्यस्थान, उडीसासह देशातील विविध राज्यातून भागातून ८५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.यात १२० जणांनी (पोस्टर प्रदर्शन)भितीपत्रकांचे सादरीकरण केले तर २९ जणांनी तोंडी सादरीकरण केले.अंत्यत उत्कृष्टरित्या संशोधनात्मक भितीपत्रकांचे विद्यार्थ्यांने सादरीकरण केले.विशेष या प्रदर्शनात मुलींनी आपला दबदबा कायम ठेला.दोन्ही सादरीकरणात मुलींनीच बाजी मारली.तोंडी सादरीकरणात वैष्णवी पडांगळे प्रथम, वैष्णवी धुमाळ व्दितीय तर फातेमा सय्यद हिने तिसरा क्रमांक पटकावला.याचबरोबर प्रमोद करवणे व ऋतुजा शेळके यांना भितीपत्रकांच्या सादरीकरणात प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आले.वरील विजेतांना डॉ. शैलेश वांझे,कवि.भारत सातपोते,डॉ. सी.एन.जंगमे,संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर बावगे,उपाध्यक्षा जयादेवी बावगे,वेताळेश्वर बावगे,शिवलिंग जावळे,सुनिल गरड,महेश कदारे,प्राचार्या डॉ. श्यामलिला बावगे,नंदकिशोर बावगे,आदिच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रा.स्नेहा वाकडे यांनी केले.

औषधे-गोळ्यापेक्षा माणसे माणूसकीने बरे करा
--------------------
आपल्या जीवनाकडे गांभीर्याने बघा,पोट रिकामे राहिले तर चालेल,पण मन उपाशी राहु नका.सतत मन प्रसन्न ठेवा.निरोगी रहाल,औषधे-गोळ्यावर उपचार करण्यापेक्षा माणुसकीने माणसे बरे करा,असे आवाहन विद्यार्थ्यांना कवि भारत सातपोते यांनी केले.या देशात घाम विकत घेणाऱ्यांना किंमत आहे.पण घाम गाळणाऱ्याऔना किंमत नाही. व्यसनाधीन होवू नका,जीवनात भ्रष्टाचारांच्या विरोधात लढा उभा करा.महापुरुषांच्या देशात दारुचे अड्डे कसे.व्यायाम करून शरीर कमवा,आणि स्वत:वर प्रेम करण्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments