बेलकुंड येथे रमजान ईद बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.
औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील बेलकुंड येथे रमजान ईद व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गोलाई चौकात बसवेश्वर महाराजाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच विष्णु कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच सचिन पवार, पत्रकार विलास तपासे, पोलीस पाटील व्यंकट साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल गिरी, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, अमित सोलापुरे, अण्णा बदुले, रत्नदीप बदुले, शिवराज कोरके, संजय कोरके, भीमराव शिंदे, गोटु सोलापूरे, अमर स्वामी, स्वप्निल तोळमारे, वाघा कांबळे, समाधान कांबळे, रमेश पांढरे, बालेखा पठाण आदी नागरिक उपस्थित होते, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाने नमाज पठण केली. तसेच हिंदू बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सरपंच विष्णु कोळी, सम्राट युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, महंमद पठाण, रसुल पठाण, मेहबूब शेख, व्हाईस चेअरमन संतोष हलकरे, अन्वर शेख, वंचित बहुजन आघाडीचे बेलकुंड शाखा अध्यक्ष अखिल शेख, माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद वगरे, अशोक जाधव अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या तसेच सकाळ पासून बेलकुंड मध्ये चार धर्माचे लोकांचे सन असल्यामुळे गजबज पहायला मिळाली. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवाना शुभेच्छा दिल्या बेलकुंड गावामधे जयंती व रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments