एक जबाबदार विरोधी पक्ष नेतृत्व म्हणून काम करणारा सय्यद मुजफ्फर अली इनामदार
समाजकार्य करण्यासाठी तळमळ असावी लागते. सत्ता नसतानाही काम करणे मोलाचे ठरते. सत्ता असताना जनहिताची कामे झाली नाहीत तर ते राज्यकर्त्यांच्या दृष्टीने हिताचे ठरणार नाही. जनतेच्या आशीर्वादावरच नेतृत्व तयार होतं असते. सत्ता येते आणि जाते सत्ता क्षणिक असते हे लक्षात ठेवले तर लोकहिताला प्राधान्य देणे शक्य. जनमत मात्र अशा घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून असते. पक्षाच्या धोरणावर ठाम राहात कोणत्या प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता आपला आवाज बुलंद करत जनसेवेचा वसा जपत आपली वाटचाल संथ गतीने करीत आहेत. एमआयएम चे नेते माननीय सय्यद मुजफ्फर अली इनामदार वास्तविक पाहता औसा सारख्या ऐतिहासिक बहुपक्षीय शहरात एमआयएम पक्षाचे स्वतंत्र ज्योत हाती घेऊन अंधारात ही चाचपडणाऱ्या गोरगरिबांना इनामदार मार्ग शोधत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मानवी जीवनात दिवस महिने वर्ष येतात नी जातात खऱ्या अर्थाने तेज आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर प्राप्त होत असते. सुमारे 17 वर्षांपूर्वी हैदराबाद येथील पैगंबर वाशी सुल्तान सलाहोद्दीन ओवैशी साहेब यांच्यानंतर आणि खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली तर महाराष्ट्रात सर्वप्रथम औसा येथे श्री इनामदार यांनी रोवली. आपल्या कार्याने त्यांनी काही मोजक्या वर्षातच आश्चर्यकारक काम केले. मागे म्हटल्याप्रमाणे समाजसेवेचे बाळकडू त्यांना आपल्या आई वडीला कडूनच मिळाले. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजसेवा म्हणजे पदरात काही पडत नसते. ते निरपेक्षपणे सामाजििक प्रश्नांसह मुस्लिम समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सतत प्रयत्नशील असतात. औश्यासारख्या बहुपक्षीय शहरात आपले त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात प्रखर विरोध झाला. त्यांनाही पुरून उरले इनामदार. इनामदार समाजकारण राजकारण करत असताना त्यांनी "इनामदार" या बहुमूल्य सूत्राचा विसर पडू दिलेला नाही. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून 50000 कर्जपुरवठा मागणी लावून धरली. या 170 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. सदर जाचक अटी रद्द करण्यासाठी भाग पाडले. औसा ग्रामीण रुग्णालयातील लसीची टंचाई वेळोवेळी वरिष्ठाकडे मागणी लावून धरली. नगरपरिषदेच्या वतीने भाजी मार्केट व्यवसायिकांना लावलेली करवाढ कमी करून घेतली. औसा लातूर रोड वरून जाणाऱ्या गाड्या गावात यावे म्हणून प्रसंगी आंदोलने केली. शहरासाठी स्वतंत्र अग्निशमनयंत्रणा उपलब्ध व्हावी म्हणून शासकीय पातळीवर पाठपुरावा केला. त्यांंच्या प्रयत्नाला यश येऊन रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली. त्यांनी एक ना अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. उत्सवाच्या काळात गणेश उत्ससव, दसरा-दिवाळीी, रमजान ईद या कालावधीत नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा, रस्ते, पााणी, वीीज, रास्त धान्य या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा म्हणून पाठपुरावा केला व त्यात यश आलेे. मा. न्यायमूर्ती राजेंद्रसिंह सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी शासनाने करण्यात यावी यासाठी इनामदार सत्त पाठपुरावा करीत आहेत . मुस्लिम समाज मागास आहे. शिक्षण, नोकऱ्यात नगण्य प्रमाण आहे. या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, रोजगार यापासून दारिद्र रेषेखालील हजारो कुटुंबे आजही वंचित आहेत. न्यायमूर्ती सुन्दरलाल कमिशन 1948 अहवालाच्या शिफारसी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला. कोवीड महामारीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीत मोलाचा वाटा उचलला. गोरगरिबांनाहि आवश्यकती मदत केली, शहराचाा पाणीपुरवठा प्रश्न उचलून धरला, जनहिताच्या प्रश्नासाठी यासाठी आम्ही लढत राहू आम्हालाा श्रेय नको असे ते म्हणत असतात. जनतेेेेचा आवाज बुलंद करण्याचा पयत्न करत आहेत. मुस्लिम आरक्षणासह शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवलाा. कोवीड काळातील वीजबल माफ करण्यात यावे, पिक विमा अनुदान प्रश्नासाठी धारेवर धरले. वर्ष 2016 ते 2022 पर्यंत कोणतेही पद नसताना नगरपरिषदेला आंदोलनाच्या माध्यमातून मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. एक जबाबदार विरोधी पक्ष नेतृत्व म्हणून काम करताना समाजाने प्रशासकीय पातळीवर एक माध्यम म्हणून प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. राजकारण करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून राहिल्यामुळे इनामदार कुटुंबीयांना पवित्र हाज यात्रेचा लाभ झाला. इनामदार यांच्या हातून असेच जनसेवा घडावी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या हार्दिक शुभेच्छा!
0 Comments