औसा शहरातील विविध समस्यांवर लक्ष देऊन सर्व समस्यांवर निराकरण करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील विविध समस्यांवर एम आय एमच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊनही त्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष  होत आहे.तरी औसा शहरातील विविध समस्यांवर लक्ष देऊन सर्व समस्यांवर निराकरण करण्यात यावे.या विविध मागणीसाठी एम आय एमच्या वतीने औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना 25 मे बुधवारी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे
तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण जलदगतीने करण्यात यावे.
औसा शहरात ब-याच ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत ते त्वरित चालू करावी.
शहरातील पाणीपुरवठा 20 दिवसाआड होत आहे,तो 4 दिवसाआड करावा.
शहरातील नाली व गटारी पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यात पाणी आडुन दुर्गंधी व रोगराई होणार नाही.
शहरातील घाण ही दररोज घंटागाडी द्वारे नेण्यात यावे.
शहरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून ते त्वरित काढण्यात यावे.
शहरातील विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी विकास काम होत आहेत, ज्यांच्या घरापासून अंदाजपत्र तयार करण्यात आले आहेत,ती जागा वगळुन मनमानी कारभार संबंधित गुत्तेदार करीत आहे व कामावर मटरेल टाकून पुन्हा परत घेऊन जात आहेत.मनमानी कारभार चालू आहे त्यावर प्रशासनांनी लक्ष देण्यात यावे.
शहरातील होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहे, त्यांच्याकडे नगर प्रशासनाने दर्जेदार कामे करुन काम अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावेत. वरील सर्व समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे अन्यथा एम आय एमच्या वतीने तिवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments