बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड शेतकऱ्यांना वरदान
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्याच्या एकूण खरीप लागवड योग्य क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी पसंती दर्शवली असून मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे अधिक वाढला आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे शेतकर्‍यांना सोयाबीन पीक हे नगदी पीक म्हणून वरदान ठरत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून सरी-वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास या सरी मध्ये पडलेल्या पावसाचे पाणी थांबते आणि सोयाबीन पिकाची वाढ व्यवस्थित होऊन अधिक उत्पादन घेता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरी-वरंबा पद्धतीने म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे जर लागवड केली तर सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेतात सरी-वरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करावी आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी उत्पन्नवाढीसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात उत्पन्नवाढीसाठी वरदान ठरणार आहे.
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांनी औसा तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले असून मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक या कामी शेतकऱ्यांशी संवाद साधत असून शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असेही आवाहन कृषी अधिकारी संजय ढाकणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments