औशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन
औसा प्रतिनिधी
औसा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी निवेदन सादर केले आहे.या प्रसंगी वेळेचे भान व महत्व लक्षात घेण्यासाठी व जागरुकतेसाठी औसा नगर परिषदेला निवेदन देऊन घड्याळ भेट दिली.या निवेदनात असे नमूद केले आहे.औसा शहरास नळाला 20 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.ऊटी धरणात मुबलक पाणी साठा असताना पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळै नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे व त्यांचे हाल होत आहेत.तसेच प्रत्येक वार्डात घंटागाडी दिलेली असताना वार्डात आठ-आठ दिवस घंटागाडी येत नाही.त्यामुळे रस्त्यांवर घाण होत आहे.तरी पाणीपुरवठा व स्वच्छता प्रकरणी विशेष लक्ष देऊन चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा व दररोज प्रत्येक वार्डात घंटागाडी पाठविण्यात यावी.अशी मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 23 मे 2022 सोमवार रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वेळेचे भान व महत्व लक्षात घेण्यासाठी व जागरुकतेसाठी औसा नगर परिषदेला घड्याळ भेट दिली.
यावेळी निवेदन सादर करताना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष जावेद शेख,मेहराज शेख,भरत सूर्यवंशी,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव,माजी स्वीकृत सदस्य रुपेश दुधनकर, सुलेमान शेख,माजी नगरसेविका किर्ती ताई कांबळे, अविनाश टिके, सुलेमान शेख, अँड वकील इनामदार,अफसर शेख,ऊमर पंजेशा,बासीद शेख,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments