औशात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी .....औसा ( प्रतिनिधी )- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती औसा शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा शहरातील अनेक चौकात  व्यासपीठावर उभारण्यात आल्या होत्या . याठिकाणी समाजबांधव , राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले ..मुख्य कार्यक्रम शहरातील नंदीमठ येथे महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे वीरशैव समाजाचे अध्यक्ष  सुभाषप्पा मुक्ता यांच्या हस्ते   पुजन व ध्वजारोहन करुन संपन्न झाला .त्यानंतर येथील बसवेश्वर गल्लीत वीरशैव कक्कय्या समाजाच्या सभागृहात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन राजाभाऊ कटके  यांच्या हस्ते करण्यात आले .येथील गांधी चौक , लातूर वेस हनुमान मंदिर परिसर , लातूर टी पाँईट चौक येथे ही प्रतिमा पुजन करण्यात आले .आमदार अभिमन्यू पवार यांनी नंदीमठ व गांधी चौक येथे महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन केले . यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रणील नागराळे ,कार्याध्यक्ष रवि कोपरे प्रा .शिवरुद्र मुरगे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठेसे , गुरपद शेटे , विश्वनाथ राचट्टे ,  भाजपाचे संतोष मुक्ता सुनिल उटगे ,  बाजार समितीचे संचालक संगमेश्वर उटगे ,गिरीश इळेकर , अमर रड्डे , वैजनाथ सिंदूरे , सुमित पारुडकर ,  प्रा .तिळगुळे , केदार रड्डे , भिमाशंकर मिटकरी सचिन मिटकरी शिवकुमार मुरगे , दयानंद बनाळे , यांच्यासह अनेक समाजबांधव व युवा कार्यकर्ते उपस्थित होते .. सायंकाळी नंदीमठापासून शोभा यात्रा काढण्यात आली होती .

Post a Comment

0 Comments