*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीचे आयोजन*
*मुंबई दि (प्रतिनिधी) माजी आमदार टी एम कांबळे संस्थापक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या संकल्पनेतुन स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.*
बुधवार दि 4 मे रोजी च्या सर्वसाधारण सभेला पक्षप्रमुख कनिष्क कांबळे संबोधित करणार आहेत, यावेळी गड किल्ले लेणी संवर्धक, समाज वा संविधान रक्षक, अंतरराष्ट्रीय कीर्ती चे बौद्ध भिक्षु पूज्य भन्ते शिलबोधी व राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इम्रान मन्सूरी, मुख्य प्रवक्ता ऍड. नितीन माने, प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य महासचिव श्रावण गायकवाड व नवनिर्वाचित मुंबई प्रदेशाध्यक्ष योगेश गायकवाड आपली मते व्यक्त करणार आहेत.
0 Comments