*महाराष्ट्र दिन प्रा.शा.बुधोडा येथे उत्साहात साजरा*
औसा प्रतिनिधी
आज दि.१ मे रोजी २०२२ रोजी जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे शाळेच्या प्रांगणात गावच्या सरपंच सौ. अज्ञानबाई मगर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. युवराज घंटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने *'महाराष्ट्र/ कामगार दिन'* साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.अमरदीप कांबळे,सर्व सदस्य,आरोग्य विभागाचे श्री. शिवाजी सुतार,ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी,तंटामुक्ती सर्व पदाधिकारी,शिक्षणप्रेमी नागरिक,शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शाळेचे विदयार्थी,अंगणवाडी ताई,आशाताई व मोठ्या संखेने ग्रामस्थही उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहणानंतर लागलीच इयत्ता १ ली ते ८ वी च्या विदयार्थ्यांना अतिथींच्या हस्ते *'प्रगतीपत्रक'* देवून निकाल जाहीर करण्यात आला.
तसेच *सुट्टीतील अभ्यासिका "आपण वाचूया :भाग दोन"* या पुस्तकांचे वितरणही करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करुन विदयार्थ्यांचे कौतुक केले व उन्हाळी सुट्टया आणि अभ्यास याबद्दल शुभेच्छा दिल्या .
0 Comments