रेवणसिद्धप्पा उटगे यांचे वृद्धापकाळाने निधन
 औसा प्रतिनिधी
 औसा नगर परिषदेचे माजी नगरसेवक व होमगार्ड विभागाचे माजी समादेशक तथा सिद्धेश्वर सहकारी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रेवणसिद्धप्पा गिरमलप्पा उटगे वय 85 वर्षे यांचे सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी दुपारी तीनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले .सिद्धेश्वर सहकारी बँकेचे कर्मचारी शिवकुमार उटगे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या  पार्थिवावर पावसा येथील लिंगायत स्मशानभूमीत सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments