"थोडेसे माय बापासाठी पण" कार्यक्रमांतर्गत 60 वर्षावरील सर्व मायबापाची गावोगावी आरोग्य तपासणी

आसिफ पटेल औसा 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.आर शेख तालुका आरोग्य अधिकारी औसा, डॉ. मकरंद जाधव, डॉ. शिवलिंग शेट्टे, मातोळा प्राथमिक केंद अंतर्गत येणार्‍या नांदुर्गा आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत थोडेसे माय बापासाठी पण या कार्यक्रमा अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती फेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्रतील नांदुर्गा, नांदुर्गा तांडा, नांदुर्गा भाग 2, व गुबाळ येथे 60 वर्षावरील सर्व माय बापाची होतेय आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यासारखे गांभीर् आजारांची डॉ. स्वाती फेरे व त्यांच्या टीमने तपासणी व उपचार करण्यात आले आहेत तसेच गांभीर् आजारासाठी संदर्भ सेवा देण्यात येत आहे. समाजातील दुर्लक्षित राहणारे ह्या माय बापाकडे आता आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन दिले आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कोरोणाच्या महा मारीत दिवस-रात्र जीवाची परवा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ.स्वाती फेरे यांचे नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव,तांडे,वस्तीतील नागरिकांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमांतर्गत डॉ. स्वाती फेरे, उर्मिला मोरे,बालाजी सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments