मान्यवरांच्या उपस्थितीत बाखीर आर पटेल यांचा विवाह थाटात संपन्न 
औसा प्रतिनिधी औसा येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रहेमतुल्ला उर्फ चांद पटेल यांचे सुपुत्र बाखीर पटेल यांचा विवाह केदारनाथ मंगल कार्यालय औसा येथे दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सात वाजता थाटात संपन्न झाला.या विवाह सोहळ्यासाठी औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संतोष सोमवंशी, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, शिवसेना युवा बजरंग जाधव, रयत क्रांती संघटनेचे राजू कसबे, श्री साईबाबा शुगर्सचे चेअरमन राजेश्वर बुके, न्युज18 लोकमत लातूर जिल्हा प्रतिनिधी नितीन बनसोडे, काँग्रेस प्रदेश सहसचिव अमर खानापुरे, मच्छिंद्रनाथ महाराज, खारी रफिकसाब सिराजी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे रशीद शेख आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी युवा नेते संतोष मुक्ता, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषअप्पा मुक्ता, राजाभाऊ केवळराम, आदम खान पठाण, ऍड मुजाहिद पटेल, ऍड हशम पटेल लमजांकर,सईद सावकार यांच्यासह औसा तालुका पत्रकार संघ, औसा तालुका मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अनेक सदस्य व पत्रकार सामाजिक शैक्षणिक राजकीय व उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते केदारनाथ मंगल कार्यालय औसा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाखीर आर पटेल यांच्या विवाहानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.
आलेल्या सर्व मान्यवरांचे आसिफ पटेल इंडिया टीव्ही व पटेल परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments