संगायोअतंर्गत 20 जणांना पेंशन मंजुरीचे पत्र संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते वाटप
औसा मुख्तार मणियार
औसा-हासेगाव येथील हॅप्पी इंडियन विलेज व सेवालयातील संक्रमित एड्स मुलांना संगोयातील मासिक पेन्शन देण्याचा निर्णय निराधार समिती व तहसील प्रशासनाने घेतला. त्यातील 20 जणांना शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र देण्यात आले. निराधार समितीच्या सदस्या जयश्री उटगे यांच्या पुढाकाराने राबविलेला राज्यातील अनोखा उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. जगातील पहिलीच हॅप्पी इंडियन विलेज  हासेगावच्या रानमाळावर बहरत आहे. 2007 पासून रवी बापटले यांनी सुरू केलेल्या एड्स संक्रमित मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांचे संपूर्ण जीवन जगण्याची सोय येथे केली जाते. फक्त समाजसेवा भावनेतून चालणाऱ्या सेवालयातील मुलांना शासनाची मदत व्हावी, जेणेकरून त्यांना काही प्रमाणात मदत होईल सदरची संकल्पना नेत्या जयश्री उटगे  यांनी निराधार समिती व तहसील प्रशासनाच्या सहकार्याने राबवून येथील 20 जणांना संगोयाअंतर्गत आधार दिला.  सेवालयातील सर्व 85 जणांना पेन्शन योजना देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात वरील 20 जणांचा   पेन्शन मंजुरीचे पत्र शुक्रवारी संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी, राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, सेनेची जिल्हाप्रमुख शिवाजी माने, निराधार समितीच्या अध्यक्ष बबन भोसले ,नरेंद्र पाटील, किशोर जाधव, प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments