बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे स्वयंप्रकाशित झालो
- ॲड जयराज जाधव
औसा-दि16 मे 2022 रोजी औसा तालुक्यातील मौजे नागरसोगा या गावी महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची 2566 वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी औसा येथील विधीज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते अँड जयराज जाधव यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरसोगा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाराम आडसुळे यांची नियुक्ती करण्यात आली.
तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्याम खरात यांना पाचारण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्याम खरात यांच्या हस्ते महाकारुनि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या डॉ बाबासाहेब यांच्या प्रखर विचाराने त्यांनी दाखवलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानाने ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ते स्वयम प्रकाशित होऊ शकले आणि जीवन जगण्यास सक्षम झाले असल्याचे प्रतिपादन केले.
0 Comments