हरभरा खरेदी केंद्रास 15 दिवसाची मुदत वाढ देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी
 
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी औसा तहसीलदार यांना आम आदमी पार्टीचे निवेदन
औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासन केंद्र शासन मार्फत नाफेड मार्फत हरभरा हमीभाव केंद्र चालु करण्यात आले होते ते दिनांक 23  मे 2022 पर्यंत चालू होते. केंद्र शासनाने दिनांक 29/मे  2022 रोजी पर्यंत शेतक-यांचा ऑनलाईन केलेल्या) हरभरा खरेदी करणेस मान्यता दिली होती मात्र अचानक शासनाचे खरेदी पोर्टल बंद करण्यात आले आहे .ज्यामुळे अनेक ऑनलाईन केलेल्या शेतक-यांचे हरभरा धान्य त्यांचे घरी पडून आहेत. शासनाने अचानक बंद केलेल्या खरेदी पोर्टलमुळे व्यापा-यानी हेतुपुरस्सर भाव पाडले असून सामान्य शेतक-यांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक करून अंदाजे 4200/- रुपये पर्यंत भाव मात्र देण्यात येत आहे. शासनाने हेतुपुरस्सर सदरील खरेदी पोर्टल बंद केल्यामुळे सामान्य शेतक-यांची मोठी अडचण झाली आहे. सदरील खरेदी केंद्रास 15 दिवसाची मुदतवाढ देवून शेतक-यांस  दिलासा दयावा. त्याची आर्थिक पिळवणूक थांबवावी, हरभरा खरेदी केंद्रास मुदतवाढ न दिल्यास शेतकरी शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन, उपोषण करतील परिणामास शासन जबाबदार राहील, आमची मागणी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांना तात्काळ कळवून शेतक-यांची  मागणी मान्य करावी .अशी आम आदमी पार्टीच्या वतीने औसा तहसीलदार यांना आज दिनांक 27 मे 2022 शुक्रवार रोजी निवेदन सादर केले यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अनील मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख,मिडीया प्रमुख मुख्तार मणियार,उपशहराध्यक्ष अली कुरेशी,अमीर शेख, अँड जी एच कुसुमकर, अँड जेटनवरे बी बी,नवनाथ बाबुराव पवार (कोरंगळा) दत्ता विठोबा किनीकर (बोरफळ) संतोष दळवे (करंजगाव)शिवराज इंगळे (याकतपूर) विद्यानंद जोगदंड (याकतपूर) संदीपान नारायण मोरे,गोंवीद भोसले (गोंद्री) उषा अंबाजी झिंगे (चिंचोली जोगन) व्यंकट रावसाहेब मातोळकर (माळकोंडजी)आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments