केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम भोसलेची उत्तुंग भरारी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील किल्लारी येथील शुभम भोसले या विद्यार्थ्यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून 149 वा क्रमांक पटकावून उत्तुंग भरारी संपादन केली आहेत.शुभम संजय भोसले हा मुळचा औसा तालुक्यातील किल्लारी येथील असून त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.आई गृहिणी असुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होत पुढे त्याने माध्यमिक शिक्षण घेतले. शुभम ला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे 98 टक्के गुण मिळाले होते त्यावर उच्च माध्यमिक बारावी विज्ञान मध्ये त्यास 90 टक्के गुण मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी पदवी संपादन केली आपण वर्ग 1 चा अधिकारी व्हावे असे त्याच्या मनोमन इच्छा असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे तयारी करू लागला आणि त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठले मागील दोन वर्षापासून कोरुना प्रादुर्भावामुळे त्यास अनेक अडचणी येत असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि खडक लोक डाऊन असताना सुद्धा त्याने अभ्यास करीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले औसा तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने हे उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments