औसा मुख्तार मणियार
प्रहार जनशक्ती पक्ष औश्याच्या वतीने पंचायत समिती समोर बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष सयाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली 13 मे शुक्रवारी पंचायत समिती औसा येथे हलकीनाद आंदोलन करून गटविकास अधिकारी यांना विविध मागणीचे निवेदन सादर केले.या निवेदनात त्यांनी असे उल्लेख केला आहे.
दिव्यांगाना दिला जाणारा 5 टक्के निधी आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीने वाटप केलेला नाही.
शिवली,आंदोरा गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची कामे अपूर्णच आहे.
आंदोरा गावातील पिण्याचे शुद्ध पाणी जनतेला मिळत नाही.
आर.ओ.प्लॉंट मागील काही वर्षांपासून धुळ खात पडला आहे.
रमाई योजनेतील घरकुलांची पूर्ण झालेली कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे कामे तात्काळ सुरू करण्यात यावी.
संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये चालू असलेली राष्ट्रीय पेयजल योजना आणि राष्ट्रीय जल जीवन योजना यांचे काम तात्काळ पारदर्शकपणे पूर्ण करुन पाणीपुरवठा त्वरित चालू करावा अन्यथा येणाऱ्या 10 दिवसात वरील सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्यास याही पुढे याही पेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष औश्याच्या वतीने औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष रमेश शेळके, कार्याध्यक्ष लक्ष्मण राऊत, तालुका उपाध्यक्ष वाजीद पठाण,तानाजी लामजणे,रमेश भोसले, संपर्क प्रमुख दत्ता आनंदगावकर, तालुका कोशाध्यक्ष शेषेराव गिरी,अनील घोडके, संभाजी जाधव, संदेश रोंगे आदि कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या हलकीनाद आंदोलनात सहभागी झाले होते.
0 Comments