धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान
 औसा प्रतिनिधी 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाची शौर्यगाथा प्रत्येकांना अंगावर शहारे आणणारी आहे म्हणून येथील धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ औसा यांचा वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर दिनांक 13 मे रोजी सायंकाळी सात वाजता औसा येथे धर्मवीर संभाजी जी महाराज चौक येथे शिवशंभो व्याख्याते राकेश पिंजण सरकार पुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जयंती समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या शौर्यगाथेचे सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने आयोजित व्याख्यान कार्यक्रमास शिवशंभो भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ औसा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments