आर.आर. इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

आर.आर. इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
-------------------------------------
 लातूर:- श्री ऋषिकेश राजकुमार पाटील यांनी कमी कालावधीत आर.आर. इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स ची स्थापना करून गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम करून आपला नावलौकिक प्राप्त केलाआहे. या आर.आर. इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स च्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिनांक 3 एप्रिल रोजी अशोक हॉटेल परिसरातील बिडवे मार्केट येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर श्री माननीय चंद्रकांतजी बिराजदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून साई शुगरचे चेअरमन राजेश्वरजी बुके हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक ऍड. उमेश पाटील,  शिक्षण विस्तार अधिकारी श्री निवृत्ती जाधव साहेब, प्रतिष्ठित शेतकरी केदार निलंगेकर हे उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा आर.आर. डेव्हलपर्सच्या वतीने श्री.आर. सी. पाटील,  पी. सी.पाटील व डी. सी.पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन मान्यवरांचा सत्कार केला,  याप्रसंगी उपमहापौर श्री चंद्रकांत बिराजदार यांनी ऋषिकेश पाटील यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. व काही अडचणी आल्यास आपण योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार आहोत असे अभिवचन दिले. तसेच अध्यक्ष श्री राजेश्वरजी बुके यांनीही आर. आर.डेव्हलपर्सच्या कार्याचे कौतुक करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यात श्री काशिनाथ आप्पा आग्रे, श्री रेशमे गुरुजी, श्री विशाल पाटील, श्री शिवानंद कोरे, श्री. सतीश बेल्लाळे, श्री महादेव खिचडे, श्री अमोल पाटील,  श्री संगमेश्वर एरटे श्री. माशाळकर डी. बी. व दादा पाटील.. व त्यांचा असंख्य मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यादव बी.पी.यांनी केले....

Post a Comment

0 Comments