वाचनालयाच्या आरक्षित जागेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार निंबाळकर यांच्याकडे मागणी

वाचनालयाच्या आरक्षित जागेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार निंबाळकर यांच्याकडे मागणी 
औसा प्रतिनिधी
 औसा नगरपरिषदेच्या हद्दीत सर्वे नंबर 90 मध्ये नऊ गुंठे जमीन वाचनालयासाठी आरक्षण क्रमांक 51 नुसार नगरपालिकेने आरक्षित केली असून या जागेवर वाचनालय उभे करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे‌. लोकनेते विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन ही करण्यात आले होते. औसा नगरपरिषदेच्या डीपी प्लॅनमध्ये आरक्षण क्रमांक 51 नुसार विकास आराखड्याच्या नकाशात वाचनालयाचा उल्लेख आहे. तसेच सातबारा उताऱ्यावर सदर नऊ गुंठे जमिनीच्या वाचनालयासाठी उल्लेख असून या जागेवर भव्य वाचनालये उभे करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. या निवेदनावर शेख मुजम्मिल, जयराज कसबे, ॲड शहानवाज पटेल, भागवत मेत्रे अमोल कंटेकर आणि खुंदमीर मुल्ला यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments