महादेव वाडी येथील यात्रा उत्साहात संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील महादेव वाडी किनीथोट येथील शंभू महादेवाच्या यात्रेचे भव्य आयोजन मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात येते. अखंड शिवनाम सप्ताह कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमासह शिव कीर्तन व प्रवचनाची परवणी भाविक भक्तांना मिळाली तर अभंग वाणी कार्यक्रमाने भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते.दिनांक 14 एप्रिल रोजी महादेव वाडी च्या पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावून शिस्तीत दर्शन घेतले मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील विविध गावातील मल्ल जंगी कुस्त्या मध्ये भाग घेण्यासाठी आले होते. महादेव वाडी येथील मंदिर समितीच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भक्तांना दर्शन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या यात्रेमध्ये लातूर उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातील भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
0 Comments