लातुर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने हसेगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
औसा प्रतिनिधी
रमजानचा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. 

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हसेगाव ता . औसा येथे भव्य इफ्तार चे आयोजन करण्यात आले. या इफ्तारच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन घडले.

यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा सुधीर पोतदार सर,मारुती महाराज कारखान्याचे संचालक सचिन पाटील सर, युवक काँग्रेसचे सरचिटणीस वेताळेश्वर बावगे, विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष रवी पाटील, युवक काँग्रेसचे मुकेश बिदादा, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा औसा तालुका निरीक्षक रामराजे काळे, ओमप्रकाश गरड,बालाजी बावगे,सलीम शेख,बब्बर पठाण, प्रल्हाद कांबळे,वैजनाथ राठोड,प्रभू हंगरगे, माने संतोष,जैनोद्दीन पठाण, राजू बोईने, अमोल राठोड,मुस्लिम बांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments