इफ्तार - ए-दावत कार्यक्रमात संतोष सोमवंशी यांचा सत्कार 
औसा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अमर खानापूरे यांनी आयोजित केलेल्या इफ्तार - ए-दावत या कार्यक्रमात संतोष सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला 
या कार्यक्रमात हिंदू मुस्लीम ऐक्य दर्शन पाहावयास मिळाले अमरजी खानापुरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला 
याप्रसंगी महंत राजेंद्रगीर महाराज, कॉंग्रेस नेते शेषेराव पाटील, लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडे, युवक काँग्रेसचे हणमंत राचट्टे, शिवसेनेचे बजरंग जाधव, शहरप्रमुख सुरेश भुरे,, माजी नगरसेवक बंडू कोद्रे, नगरसेवक गोपाळ धानुरे, जयराज कसबे अदी सह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments