रमजान ईद निमित्ताने इदगाह मैदानावर भव्य मंडप व पिण्याच्या पाण्याची  सुविधा उपलब्ध करा:एम आय एम ची मागणी
औसा प्रतिनिधी
*आज दी. २५ / 0४ / २0२२ सोमवार रोजी एम आय एम पक्ष ता औसा जि लातूर च्या वतीने दी .0३ / 0५ /* *२0२२/रोजी ईद ऊल फीत्र*, *रमजान ईद च्या निमित्ताने*
 *प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी औसा ईदगाह मैदानावर भव्य मंडप व ईतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे. या मागणीचे निवेदन आज मुख्याधिकारी साहेब यांच्या कडे देण्यात आले असुन त्याच अनुषंगाने पालकमंत्री लातूर जिल्हा यांच्या कडे ही निवेदन देण्यात आले आहे एम आय* *एम पक्षाची मागील २0१५ पासुन मुख्य मागणी असुन ही मागणीला अखेर २0१९ मधे औसा नगर पालिकेने मान्य केली आहे तरीही प्रति वर्षाप्रमाने याही वर्षीऔसा ईदगाह मैदानावर मंडप व ईतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे या रास्त मागणीचे निवेदन एम आय एम पक्षाच्या वतीनं व औसा शहरातील मुस्लिम बांधव यांच्या वतीने देण्यात आले यावेळी निवेदन देताना एम आय एम पक्षाची मुलुख मैदानी तोफ एम आय* *एम माजी लातुर जिल्हा उपाध्यक्ष, तथा कायदेशीर सल्लागार Adv.गफुरुल्लाह हाशमी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित सय्यद कलिम एम आय एम युवक माजी औसा तालुकाध्यक्ष , मुजीब बागवान ,एम आय एम युवा नेते सय्यद जमीरोद्दीन , शकील देशमूख , हाफीज जाकेर मौलाना, शेख अहेमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments