झुकलेला विद्युत पोल बदलून दुसरा पोल टाकावा..उमर पंजेशा
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मोमीन गल्ली येथील हसीना उर्दु शाळेच्या बाजूस असलेला विद्युत पोल हा कोणत्याही वाहनाने धडक दिल्याने वाकलेला आहे.व त्यावरील विद्युत तारा खाली वाकलेल्या आहेत.सध्याच्या वावटळीच्या वातावरणात सदरचा विद्युत पोल केव्हाही पडुन जिवीत किंवा वित्तहानी होऊ शकते.त्या अनुषंगाने हसीना उर्दु शाळेच्या बाजूस झुकलेला विद्युत पोल बदलून दुसरा पोल टाकावे.जेणेकरुन भविष्यात होणारी हानी टाळावी.या मागणीचे निवेदन दिनांक 22 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी औसाचे अभियंता यांना उमर पंजेशा,खुंदमीर कलीम तत्तापुरे यांनी निवेदन सादर केले आहे.या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments