कृषी विभागातर्फे आलमला येथे शेतकरी गटासाठी खरीप हंगामाची कार्यशाळा संपन्न
 औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्यातील आलमला येथे शेतकरी गट आत्मा या गटाचा सभासद शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे येणाऱ्या काळातील खरीप हंगामासाठी पीकपद्धती व विविध योजनांची माहिती देण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी आयोजित कार्यशाळेमध्ये आलमला येथील शेतकरी गटाचे अनेक सदस्य यांनी सहभाग घेऊन कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी पीकपद्धती व पेरणीपूर्व मशागत तसेच खते बियाणे व कीटकनाशके याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस आलमला येथील शेतकऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली.

Post a Comment

0 Comments