जि.प. प्रा. शाळेचे शिक्षक मिंड जनार्धन केरबा यांना निरोप देताना विद्यार्थी रडले.. लातूर प्रतिनिधी लातूर  जिल्ह्यातील  खंडापूर येथील जि.प.प्रा.शाळेच्या वतीने मिंड जनार्धन केरबा(शिक्षक)यांना निरोप देण्यात आला.सहवास सुटला म्हणून, सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने, नाते तुटत नाही.अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,काही वर्षांपूर्वी या जि.प.प्रा शाळेच्या वट वृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे.वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल
पंखात भरलेल्या विचार बळाने,
भारारीला सिद्ध व्हावे लागेल...
आज माझ्या सोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झाली आहे. अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहे. घेतांना आज निरोप शाळेचा, आले भरूनिया डोळे शाळेतील दिवस बनले,स्मारणाच्या पुस्तकातील पाने..
तसेच विद्यार्थ्यांचे प्रेम मिळण्याचे आणखी एक कारण शिक्षा न करणे हे असते. साने गुरुजींनी मुलांना उगाच धाक लावणे ,शिक्षा करणे असे केले नाही ...त्यातून मुले भीतीविना त्यांच्याकडे आकृष्ट झाली..कोणत्याही शिक्षकांचा भर विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी शिक्षा करण्यावर असतो किंवा चुका दाखवण्यावर असतो. साने गुरुजींनी चुका दाखवण्यापेक्षा दुरुस्त करण्यावर भर दिला.वसतिगृहात विद्यार्थी कपड्यांच्या घड्या करीत नसत,अंगणातच संडास करीत पण गुरुजी मुकाटपणे ते सारे साफ करीत. त्यांनी मुलांना कृतीतून उपदेश केला आणि मुले खजील झाले..शिक्षकांनी न्यायाधीश आणि पोलीस होण्यापेक्षा अशीही एक वेगळी पद्धत मुलांना सुधारण्याची असते... मुलांनी मारामारी केली तर साने गुरुजी काय करायचे ?असा प्रश्न मी त्यांचे विद्यार्थी सराफ सरांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, की मुलांना गुरुजी जवळ घेवून कवटाळत आणि अरे असे नसते करायचे ...असे म्हणत राहायचे....ही प्रेमाने चुकांची जाणीव करून देण्यातून मुलांना शिक्षकांविषयी जास्त माया वाटते..या दोन शिक्षकांचे वर्तन या प्रकारचे असले पाहिजे..साने गुरुजी म्हणायचे की शिक्षकाच्या व्यक्तीमत्वात एक सौम्यता असली पाहिजे..मुलाशी बोलताना आणि हाताळताना खूप सौम्यता असली पाहिजे असे गुरुजी म्हणायचे .हे मिंड शिक्षक नक्कीच तसे आहेत.  
या शिक्षकांच्या निमित्ताने मला ओशो रजनीश आठवतात.हे शिक्षक मुलांशी खूप प्रेमाने वागत आहेत त्यामुळेच मुले ढसाढसा रडली... ओशो लिहितात की लहान मुलांशी खूप प्रेमाने आणि सौम्येतेने वर्तन करणे आवश्यक असते त्यामुळे प्राथमिक शाळेतील सर्व पुरुष हटवले पाहिजेत आणि त्याजागी सर्व शिक्षिका च असल्या,ते म्हणतात की शिक्षक महिला असाव्यात पण शिक्षणात स्त्रैण असणारे शिक्षक असायला हवेत म्हणजे प्रेम करुणा सौम्यता सेवाभाव वात्सल्य ममता ही स्त्रैण असणारी मुल्ये त्या शिक्षणात असायला हवीत..महिलांमध्ये ही मुल्ये प्रधान असल्याने त्या शिक्षण क्षेत्रात असल्या पाहिजेत.पण ही मुल्ये पुरुषात पण असतात म्हणूनच ज्ञानेश्वर आणि साने गुरुजी यांना आंपण पुरुष असूनही माउली म्हणतो...या वयात मुलांना जर कठोर वागणारे शिक्षक असले तर त्यांच्या भावविश्वाची मोडतोड होते असे त्यांचे म्हणणे होते....
      आपल्याकडे शाळेत मुलांना मारू नका यासाठी कायदा करावा लागतो यातच सारे आले..पण तरीही मुलावर प्रेम करणारे शिक्षक मिंड जनार्धन  केरबा  सारखे खूप खूप शिक्षक आहेत. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव आहे. हे लातुर असो कि महाराष्ट्र ..शिक्षक विद्यार्थी नाते दिसले ....मिंड शिक्षक हे प्रेममय शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत.. प्रेम हीच शिक्षकांची आणि शिक्षणाची भाषा असली पाहिजे ..हाच या विद्यार्थ्याच्या अश्रुचा सांगावा आहे....ती प्रेमाची भाषा

Post a Comment

0 Comments