गुळखेडा सोसायटी च्या शेतकरी पॅनलची सत्यमेव जयते पॅनलवर मात शेतकरी पॅनलची जोरदार मुसाडी ;तरुणाच्या हाती गावचा कारभार80-8 5मताच्या फरकाने केला विरोधी पॅनल चार पराभवऔसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील गुळखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या निवडणूकीत एकूण 607 मतदान झाले. त्यामध्ये 40च्या जवळपास अवैध मतदान झाले. निवडणूक  ची रणधुमाळी सुरू झाली.तेव्हा पासून सभासद मधून शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने सभासद वर्गाचा प्रतिसाद वाढत असून मतदारांच्या मनात आपुलकी निर्माण झाली आहे. शेतकरी पॅनलचा वाढता प्रतिसाद हा समोरच्या सत्यमेव जयते पॅनलच्या मनात धडकी भरवणारा होता.ज्या शेतकरी सभासदांचे भाग भांडवल सोसायटी कडे आजपर्यंत किती जमा आहे यांची कोणत्याही सभासद यांना माहिती नव्हती ती तात्काळ आँनलाईन पध्दतीने सभासदांना कळवण्यात येईल, सभासद यांना दुग्धव्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल,  सभासद यांना दरवर्षी लाभांष वाटप करण्यात येईल.गावातील बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल,सोसायटी चा पुर्ण कारभार आँनलाईन व पारदर्शक करण्यात येईल.सभासदांना फळांची झाडे दरवर्षी वाटप करता येईल.सभासद यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी तात्काळ कर्ज वाटप करता येईल.असा जाहिरनामा घेऊन निवडणूक रिंगणात उतरली होती. यामध्ये सर्वात जास्त मते पटेल शबीर, भोसले राजाभाऊ, गिराम सचिन ,शेख सुलेमान , सुरवसे गोविंद, भोसले बाबासाहेब , भोसले रमेश , भोसले बाळकृष्ण,चेंडके अमोल, टिके रोहिदास, भोसले सुशिलाबाई,यादव पार्वती सर्वच उमेदवार यांना प्रचंड मतांनी सभासद यांनी विजयी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.व्ही मसलगे यांनी काम पाहिले. यावेळी गावचे गटसचिव नुर पटेल यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सभासदांनी यावेळी तरुणाच्या हातात गावची सोसायटी दिली आहे..संपूर्ण गावामध्ये विजयी भव्यदिव्य  मिरवणूक काढण्यात आली.

गुळखेडा सोसायटी च्या शेतकरी पॅनलची सत्यमेव जयते पॅनलवर मात 

शेतकरी पॅनलची जोरदार मुसाडी ;तरुणाच्या हाती गावचा कारभार

80-8 5मताच्या फरकाने केला विरोधी पॅनल चार पराभव

औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील गुळखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या निवडणूकीत एकूण 607 मतदान झाले. त्यामध्ये 40च्या जवळपास अवैध मतदान झाले. निवडणूक  ची रणधुमाळी सुरू झाली.तेव्हा पासून सभासद मधून शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने सभासद वर्गाचा प्रतिसाद वाढत असून मतदारांच्या मनात आपुलकी निर्माण झाली आहे. शेतकरी पॅनलचा वाढता प्रतिसाद हा समोरच्या सत्यमेव जयते पॅनलच्या मनात धडकी भरवणारा होता.ज्या शेतकरी सभासदांचे भाग भांडवल सोसायटी कडे आजपर्यंत किती जमा आहे यांची कोणत्याही सभासद यांना माहिती नव्हती ती तात्काळ आँनलाईन पध्दतीने सभासदांना कळवण्यात येईल, सभासद यांना दुग्धव्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल,  सभासद यांना दरवर्षी लाभांष वाटप करण्यात येईल.गावातील बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल,सोसायटी चा पुर्ण कारभार आँनलाईन व पारदर्शक करण्यात येईल.सभासदांना फळांची झाडे दरवर्षी वाटप करता येईल.सभासद यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी तात्काळ कर्ज वाटप करता येईल.असा जाहिरनामा घेऊन निवडणूक रिंगणात उतरली होती. यामध्ये सर्वात जास्त मते पटेल शबीर, भोसले राजाभाऊ, गिराम सचिन ,शेख सुलेमान , सुरवसे गोविंद, भोसले बाबासाहेब , भोसले रमेश , भोसले बाळकृष्ण,चेंडके अमोल, टिके रोहिदास, भोसले सुशिलाबाई,यादव पार्वती सर्वच उमेदवार यांना प्रचंड मतांनी सभासद यांनी विजयी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.व्ही मसलगे यांनी काम पाहिले. यावेळी गावचे गटसचिव नुर पटेल यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सभासदांनी यावेळी तरुणाच्या हातात गावची सोसायटी दिली आहे..संपूर्ण गावामध्ये विजयी भव्यदिव्य  मिरवणूक काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments