अक्सा व जिकरा चौधरी यांचा पहिला रोजा.औसा प्रतिनिधी औसा येथील जमाल नगर येथील अक्सा इलियास चौधरी केवळ 8 वर्षाची जिंकरा इलियास चौधरी केवळ 7 वर्षंची यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवून आदर्श निर्माण केला आहे. इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, औसा येथील अवघ्या सात, आठ वर्षाच्या मुलींनी दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आज वरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेल्या एप्रिल महिन्यात आला आहे. हा रमजानचा महीना आणि त्यात रमजान महिन्याचे पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता हा रोजा (उपवास) ठेवला जातो.सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पाहटे ०४ : ४५ वाजेपासून सायंकाळी ०६ : ४५ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एकही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत. या उष्णतेचा सर्व सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत असताना या छोट्या मुलींनी आपली श्रद्धा व्यक्त करत आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा (उपवास)अक्सा इलियास चौधरी व जिकरा इलियास चौधरी यांनी ठेवून पुर्ण करून आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने रोजा (उपवास) ठेवला. यामुळे त्यांचे चौधरी बिरादार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.

अक्सा व जिकरा चौधरी यांचा पहिला रोजा.


औसा प्रतिनिधी  
औसा येथील जमाल नगर येथील  अक्सा इलियास  चौधरी  केवळ 8 वर्षाची  जिंकरा इलियास चौधरी केवळ 7 वर्षंची यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवून आदर्श निर्माण केला आहे. 
इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, औसा येथील अवघ्या सात, आठ वर्षाच्या मुलींनी दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.
यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आज वरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेल्या एप्रिल महिन्यात आला आहे. हा रमजानचा महीना आणि त्यात रमजान महिन्याचे पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता हा रोजा (उपवास) ठेवला  जातो.
सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पाहटे ०४ : ४५ वाजेपासून सायंकाळी ०६ : ४५ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एकही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत. या उष्णतेचा सर्व सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत असताना या छोट्या मुलींनी आपली श्रद्धा व्यक्त करत आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा (उपवास)
अक्सा इलियास चौधरी व जिकरा इलियास चौधरी  यांनी ठेवून पुर्ण करून आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने रोजा (उपवास) ठेवला. यामुळे त्यांचे चौधरी बिरादार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments