रमजान ईद दिवशी ईदगाह मैदानावर मंडप व पाण्याची सोय करा: माजी नगराध्यक्ष जावेद शेखऔसा प्रतिनिधीरमजान ईद दिवशी ईदगाह मैदानावर मंडप टाकून पाण्याची सोय करा या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 मे 2022 रोजी मुस्लिम समाजाचा मुख्य सण रमजान सण आहे.त्यादिवशी औसा तालुक्यातील मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी येतात.सद्याचा उन्हाळा पाहता उघड्यावर नमाज पठण करणे हे कठीण होणार आहे.त्याकरीता तेथे मंडपाची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे व पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.तरी मुख्याधिकारी यांनी आपल्या कार्यालयाकडुन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही औश्याच्या ईदगाह मैदानावर रमजान ईद ईदुलफित्र या दिवशी मंडप टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.या मागणीसाठी दिनांक 22 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.यावेळी या निवेदनावर माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव,अफसर शेख, संतोष औटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments