माळी समाजाचा 3 रा राज्‍यस्‍तरीय वधू-वर परिचय मेळावा 15 एप्रिल 2022 रोजी संपन्‍न 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लातूर आणि माळी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी दयानंद महाविद्यालय लातूर येथील सभागृहात माळी समाजाचा तिसरा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्‍यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा. मकरंद सावे विभागीय अध्‍यक्ष अ.भा.म.फुले समता परिषद, कार्यक्रमाचे उदघाटक मा. संतोष माळी संचालक माळी बिल्‍डर्स & डेव्‍हलपर्स, प्रमुख पाहुणे मा.निखीलजी पिंगळेसाहेब पोलीस अधिक्षक लातूर, ह.भ.प. रविकांत वसेकर महाराज 17 वे वंशज संत सावता महाराज, मा. रवीभाऊ सोनवणे स्वियसाहयक पालकमंत्री नाशिक, मा.मुधुकर गुजकंर स्वियसाहयक पालकमंत्री लातूर, गोविंद डाके अध्‍यक्ष माळी चेबर्स ऑफ कॉमर्स, मा. पापासाहेब यादव अध्‍यक्ष वधुवर परिचय समिती, अध्‍यक्ष, पदमाकर वाघमारे,अध्यक्ष माळी सेवासंघ महाराष्‍ट्र इत्‍यादी मान्‍यवरानी मा.ज्‍योतीबा फुले, सावित्री माई फुले, संत शिरोमणी सावता महारज यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार घालून विनंम्र अभिवादन केले व दिपप्रज्‍वोलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्‍यात आली.
मा. मकरंद सावे यांनी पुणे येथील मा.फुले यांच्‍या भिडे वाडयाला व आरण येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्‍या संजिवनी समाधी दर्शनासाठी किमान वर्षातून एकदा भेट द्यावी आपले मत मांडून कार्यक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या.
मा.मुधुकर गुजकंर स्वियसाहयक पालकमंत्री लातूर यांनी माळी समाजातील विद्यार्थ्‍यासाठी वस्‍तीगृह व सहकार तत्‍वावरील हॉस्‍पीटल उभारण्‍यासाठी पाठपुरवा करण्‍याचे आश्‍वासन दिले.
मा. गोविंद डाके अध्‍यक्ष माळी चेबर्स ऑफ कॉमर्स यांनी माळी समाजातील शेतकरी, व्‍यापारी, वधुवराना व समाजबांधवानी अनमोल असे मार्गदर्शन केले. जर आपण शेतीतून माल स्‍वत: उत्‍पन्‍न करु शकतो तर त्‍या मालावर प्रक्रिया पण आपणच करा व लोकापर्यत प्रत्‍यक्ष आपणच विक्री करा असे आव्‍हान केले.
ह.भ.प. रविकांत वसेकर महाराज यांनी आपल्‍या आर्शीवचनामध्‍ये सांगितले की, ज्‍या सावता महाराजासाठी विठ्ल पंढरपूर येथून आरण येथे भेटायला आले ज्‍यांच्‍या हदयात विठ्ठलाला ठेवले अशा या सावता महाराजाच्‍या संजिविनी समाधीचे दर्शनासाठी समाज बांधवानी वर्षातून एकदातरी आरण येथे यावे. तसेच सावता माळी हे संत होते त्‍यांना समाजापुरते बांधुन न ठेवता सावता माळी असा उल्‍लेख न करता सावता महाराज असा उल्‍लेख करावा असे अव्‍हान केले. 
पदमाकर वाघमारे, अध्‍यक्ष  माळी सेवासंघ महाराष्‍ट्र यांनी तीन वर्षा मध्‍ये माळी सेवा संघाने केलेल्‍या कार्याचा आढावा सांगितला तसेच म.फुले यांच्‍या पुतळया शेजारी सावित्रीमाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्‍यासाठी परवागी मिळाली असून लवकरच कामास सुरुवात होणार असले बाबत सांगितले. 
 या वधुवर परिचय मेळावासाठी वधू 130 व वराचे 185 यांनी आपला परिचय देण्‍यात आला. सर्व वधुवराचे परिचय झालेनंतर श्रावणजी उगले उपाध्‍यक्ष माळी सेवासंघ महाराष्‍ट्र यांनी उपस्थित सर्व मान्‍यवराचे व समाज बांधव व वधुवराचे आभार मानले व कार्यक्रम संपल्‍याचे जाहीर केले. 
तसेच वधुवर परिचय मेळावा हे कार्य फक्‍त मेळवापुरतेच नसून हे सतत चालू राहणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्‍दतीने बायोडाटे (परिचयपत्र) https://forms.gle/DydmZWQ5VCLv3Zan9 (Google Forms ) भरून वधु-वरांची निःशुल्क नोंदणी करावे जणे करुन बायोडाटे हे वधुवर परिचय मेळाव्‍याच्‍या वॉटसप ग्रुप टाकता येतील असे अहवान सचिन माळी औसा तालुका अध्‍यक्ष माळी सेवा संध महाराष्‍ट्र यांनी केले.

Post a Comment

0 Comments