औरंगाबाद येथील युवकाच्या खुन्यावर कठोर कार्यवाही करा औसा प्रतिनिधी दिनांक 20 एप्रिल रोजी म्हाडा कॉलनी औरंगाबाद येथील मनोज शेषराव आव्हाड या मागासवर्गीय तरुणाचा आठ जणांनी कट रचून निर्घृण खून केला आहे. या आरोपीने सदर तरुणास लोखंडी रोड व लाकडी दांडक्याने डोक्यात पाठीवर मनक्यावर बेदम पणे मारहाण केल्यामुळे या मारहाणीमध्ये मनोज शेषराव आव्हाड या तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या 8 जणांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी व कायदेशीर कार्यवाही करून कठोर शासन करावे अशी मागणी तहसीलदार औसा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी शिंदे, युवराज कसबे, किरण कांबळे ,अमोल कसबे, रोहित जाधव, सुरज शिंदे यांच्या सह्या आहेत.

औरंगाबाद येथील युवकाच्या खुन्यावर कठोर कार्यवाही करा
 औसा प्रतिनिधी
 दिनांक 20 एप्रिल रोजी म्हाडा कॉलनी औरंगाबाद येथील मनोज शेषराव आव्हाड या मागासवर्गीय तरुणाचा आठ जणांनी कट रचून निर्घृण खून केला आहे. या आरोपीने सदर तरुणास लोखंडी रोड व लाकडी दांडक्याने डोक्यात पाठीवर मनक्यावर बेदम पणे मारहाण केल्यामुळे या मारहाणीमध्ये मनोज शेषराव आव्हाड या तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या 8 जणांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी व कायदेशीर कार्यवाही करून कठोर शासन करावे अशी मागणी तहसीलदार औसा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी शिंदे, युवराज कसबे, किरण कांबळे ,अमोल कसबे, रोहित जाधव, सुरज शिंदे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments