औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर, प्राथमिक आरोग्य केंद्र मातोळा अंतर्गत नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती फेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे अश्विनी घाडगे सरपंच नांदुर्गा व उपसरपंच आशिष पोद्दार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्त्रीरोग, बालरोग, भिषक, शल्यचिकित्सक, नेत्ररोग, दंतरोग, अस्थीरोगसह सर्व प्रकारच्या रुग्णावर तपासणी करण्यात आली तसेच शस्त्रक्रिया व इतर मोठ्या आजारासाठी औसा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या शिबिरात एकूण 134 रुग्णाची तपासणी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती फेरे यांच्या मार्फत करण्यात आली. मातोळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नांदुर्गा आरोग्य वर्धिनी केंद्र येथे आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त हे दुसरा आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्रचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती फेरे यांची उत्कृष्ट कामगिरी असून नांदुर्गा व परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या शिबिरात नांदुर्गा, नांदुर्गा तांडा, गुबाळ,सह अदि गावातील रुग्णांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला. जिल्हा हिवताप अधिकारी तथा औसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर. शेख यांनीही आरोग्य शिबिरास शुभेच्छा दिल्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्रचे आरोग्य समुदाय अधिकारी डॉ.स्वाती फेरे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतला.
0 Comments