सुभेदार रामजी बाबा प्रमाणे शिस्तप्रिय राहून पाल्यांना घडवा: ॲड जयराज जाधव औसा प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी आणि घटनाकार यांच्या स्वप्नातली समृद्ध लोकशाही घडविण्यासाठी सुभेदार रामजी बाबा यांच्या प्रमाणे शिस्तप्रिय राहुल आपल्या पाल्यांना प्रत्येकाने घडवावे. असे आवाहन ॲड जयराज जाधव यांनी केले. याकतपूर तालुका औसा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. जयंतीच्या निमित्ताने बौद्ध वस्ती चे अधिकृत प्रबुद्ध नगर असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाचा फलक अनावरण सोहळा ॲड जयराज जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ऍड अनिल मोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड हे होते. पुढे बोलताना ऍड जाधव म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर देशाची लोकशाही सक्षम पणे उभी आहे. त्यासाठी प्रत्येक पाल्याने शिस्तप्रिय समाज घडविण्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे यावेळी ऍड अनिल मोरे, हरिराम गिरी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब कांबळे, भिमराव कांबळे, अविनाश कांबळे, गोपाळ कांबळे, सुशील कांबळे, सतीश कांबळे, रोहन कांबळे, समाधान कांबळे, तुषार कांबळे, राम कांबळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुमार कांबळे यांनी केले. कार्यक्रमास महिला पुरुष व युवक यांची उपस्थिती होती.

सुभेदार रामजी बाबा प्रमाणे शिस्तप्रिय राहून पाल्यांना घडवा: ॲड जयराज जाधव 
औसा प्रतिनिधी 
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी आणि घटनाकार यांच्या स्वप्नातली समृद्ध लोकशाही घडविण्यासाठी सुभेदार रामजी बाबा यांच्या प्रमाणे शिस्तप्रिय राहुल आपल्या पाल्यांना प्रत्येकाने घडवावे. असे आवाहन ॲड जयराज जाधव यांनी केले. याकतपूर तालुका औसा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. जयंतीच्या निमित्ताने बौद्ध वस्ती चे अधिकृत प्रबुद्ध नगर असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाचा फलक अनावरण सोहळा ॲड जयराज जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ऍड अनिल मोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड हे होते. पुढे बोलताना ऍड जाधव म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर देशाची लोकशाही सक्षम पणे उभी आहे. त्यासाठी प्रत्येक पाल्याने शिस्तप्रिय समाज घडविण्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे यावेळी ऍड अनिल मोरे, हरिराम गिरी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब कांबळे, भिमराव कांबळे, अविनाश कांबळे, गोपाळ कांबळे, सुशील कांबळे, सतीश कांबळे, रोहन कांबळे, समाधान कांबळे, तुषार कांबळे, राम कांबळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुमार कांबळे यांनी केले. कार्यक्रमास महिला पुरुष व युवक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments