पोषण पंधरवाडा निमित्ताने अंगणवाडी मध्ये महिलांची HB तपासणी करण्यात आली


 पोषण पंधरवाडा निमित्ताने 

 अंगणवाडी मध्ये  महिलांची HB तपासणी करण्यात आली.

        औसा - बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग - 1( ना.प्र.)या अंतर्गत फुलेनगर, भिमनगर, संजयनगर येथील अंगणवाडी परिसरातील महिलांची पोषण पंधरवाडा निमित्ताने रक्त तपासणी  करण्यात आली. 

 या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.नलगोंडे सर ,लॅब टेक्निशियन कोरे सर उपस्थित होते.‍सुरूवातीला महिलांची रक्त तपासणी करण्यात आली.नंतर डॉ. नलगोंडे सरांनी पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले.परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांबळे निशा, कांबळे निलावती ,रायफळे शांता , गायकवाड सुमिता, गायकवाड कोमल, कांबळे सरस्वती , घोगरे मंजुषा, कसबे स्वाती , रसाळ अलका , शेख गौसिया  यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments