एम आय एम चे तालुका प्रभारी अफसर शेख राष्ट्रवादीत प्रवेश

 एम आय एम चे तालुका प्रभारी अफसर शेख राष्ट्रवादीत प्रवेश औसा प्रतिनिधी


औसा शहरातील एम आय एम चे तालुका प्रभारी इन्चार्ज अफसर शेख यांनी एम आय एम पक्षाला सोडचिठ्ठी देत  मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या  प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पार्टीत प्रवेश केला.अफसर शेख यांच्या राष्ट्रवादी  प्रवेश केल्याने औशात एम आय एम ला मोठा धक्का बसला असुन ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश सर्वांना अचंबित करणारा ठरणार आहे. त्यांनी आगामी पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्याचा निर्धार ही केला त्यामुळे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांना आणखी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.अफसर शेख यांनी एम आय एम पक्षासाठी सतत कार्यशील राहून  वेगवेगळी कामे करुन पक्षाच्या विकासासाठी कामे केले होते.असे अचानक पक्ष सोडल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने शहरात उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.असे आणखी किती जण डॉ अफसर शेख यांच्या सोबत जाणार आहेत? या चर्चेला उधाण आले आहे.एकूण पाहता एम आय एम चे अफसर शेख यांनी राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केल्याने डॉ अफसर शेख यांची ताकद वाढली जाणार असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पार्टीला नक्कीच फायदा होईल.अशी चर्चा शहरात होत आहे.अफसर शेख यांनी राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे  माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी नगरसेवक मुजाहेद शेख, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, गोविंद जाधव, वकील इनामदार, बासीद शेख आदिंनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments