तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन दिन साजरा*

 *तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन  दिन साजरा*औसा:-औसा तालुक्यातील तपसेचिंचोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  बुधवारी दिनांक 16  मार्च रोजी  इयत्ता सातवी वर्गाचा  स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.श्वेता भुजबळ हिने मुख्याध्यापक,आणि उपमुख्याध्यापक म्हणून  चैतन्य गरड व वैष्णवी बिराजदार  यांनी  कामकाज पाहिले  .


तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळा इयत्ता सातवीच्या वतीने  स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सांभाळली. पर्यवेक्षक म्हणून आरती बलसुरे व रूद्रेश पाटील यांनी काम पाहिले. मुलांना शिकत असतानाच जबाबदारीची जाणीव  व्हावी ,शिक्षकांचे कष्ट समजावेत हा हेतू यामागे होता.

Post a Comment

0 Comments