कोरोना एकल महिलांच्या पुनर्वसनासाठीच्या 'वात्सल्य योजनेतून' औसा तालुक्यातील किती विधवा महिलांना आधार दिला: मनसेची मागणी ..
औसा प्रतिनिधी
कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना आधार देण्यासाठी राज्याच्या महिला,बालकल्याण- विकासमंत्रालयाने 'वात्सल्य योजना' गेल्यावर्षी २७ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू केलेली आहे.ही योजना चांगले काम करत असल्याची माहिती परवा संबंधित खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळात दिली,या विषयावर दर आठवड्याला एक तर महिन्यातून चार बैठका संबंधित तालुक्याच्या तहसीलदार महोदयांनी (समितीने) घेणे अपेक्षित आहे मग आपल्या तालुक्यासह जिल्हाभरात अशा किती बैठका या सात महिन्यात घेण्यात आल्या व किती विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला याची माहिती आम्हाला तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी मनसेच्या वतीने औसा तहसीलदार यांना दिनांक 30 मार्च 2022 बुधवार रोजी निवेदन सादर केले आहे.
तसेच शासकीय समितीने प्रत्येक गावात पथके स्थापन करून अशा विधवा महिलांची माहिती गोळा करावी व त्यांना २५ प्रकारची कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मिळवून द्यावा. हेही या समितीकडून अपेक्षित असताना समितीने याविषयी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने या विषयावर तालुका भरातील करोनामुळे पतीचे निधन झालेल्या सर्व विधवा महिलांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी दिला आहे.यावेळी निवेदन सादर करताना मनसेचे तालुका उपाध्यक्ष समाधान फुटाणे, शहराध्यक्ष अमोल थोरात आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments