काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


 काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

औसा प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री शैल्य उटगे यांच्या वाढदिवसानिमित्त औसा शहर काँग्रेस कमिटी व विलासराव देशमुख युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने औसा येथे कोरोना महामारी च्या दक्षता घेत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 9 मार्च 2022 बुधवार रोजी ग्रामीण रुग्णालय औसा येथे एक दिवस रुग्णांनासाठी नोंदनी शुल्क मोफत करण्यात आली व तसेच कोरोना महामारीत लसीकरण मध्ये तत्परतेने सेवा केल्याबद्दल औसा ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ अंगद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, पाटील मॅडम, भिसे सर,आरोग्य सहाय्यक लोहारे डी पी,अ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व पुष्पहार घालून औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव म्हणाले औसा शहरातील नागरिकांनी कोरोना काळात व लसिकरण मध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो असे मत व्यक्त केले. व तसेच औसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना या मान्यवरांच्या उपस्थितीत फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला व तसेच, हसीना उर्दू शाळेत गरजू  विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप,व मूकबधिर शाळेतील मुलांना फळवाटप करुन असे विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी काॅग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दतोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकील भाई शेख, अॅड समियोद्दीन पटेल,मुज्जमिल शेख, गुलाब शेख, आदमखॉ पठाण, अल्पसंख्यांक चे अध्यक्ष हमीद सय्यद, अॅड फैयाज पटेल, हमीद सर, नगरसेवक अंगद कांबळे, जयराज कसबे, राजेंद्र बनसोडे, गणेश कसबे,अकरम पठाण,अजहरुल्ला हाशमी, जयसिंग ठाकूर,अमोल मिटकरी,भागवत म्हेत्रे,नियामत लोहारे आदिची उपस्थिती होती .हा

 कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला व त्यांच्या टिमने परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments