मी रमाई बोलते हा एकपात्री नाटक संपन्न.


 मी रमाई बोलते हा एकपात्री नाटक संपन्न.

औसा - आज दि.8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर मार्गदर्शित झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र औसा तर्फे बोधिसत्त्व ए‌.एल‌.एफ. च्या वतीने मी रमाई बोलते हा एकपात्री नाटक संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन बोधिसत्त्व ए.एल.एफ औसा च्या वतीने करण्यात आले होते. सदर नाटक हा कु.वैभवी घारगावकर यांनी केले. वैभवी ने रमाई च्या पात्राने  अक्षरशः उपस्थितांची मने जिंकली, आणि साक्षात रमाई डोळ्यासमोर उभा करून डोळ्यात पाणी आणलं.या कार्यक्रमाला भिमनगर, बौद्ध नगर येथील लहान थोर सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांबळे निशा, बनसोडे रूपाली, बनसोडे पार्वती, कांबळे निलावती, जाधव सुमिता, कांबळे प्रिया, सोनवणे मनिषा, बनसोडे प्राची,  बनसोडे ऐश्वर्या, सुरवसे अंजली, कांबळे पूजा, कांबळे सारीका, बनसोडे अश्विनी, बनसोडे पंचशिला  तसेच बोधिसत्त्व ए.एल .एफ ‌च्या सर्व पदाधिकारी  यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सुमिता यांनी केले.आभार कांबळे निशा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments