समदर्गा येथील महिला शेतकऱ्याचा ऊस जळाला !


 समदर्गा येथील महिला शेतकऱ्याचा ऊस जळाला !


औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील समदर्गा येथील सौ. उषाबाई हिराकांत मोहिते या महिला शेतकऱ्याच्या सर्वे नंबर २६० मधील दोन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. औसा तालुक्यामध्ये ऊस जळण्याचे सत्र सुरूच असून महावितरणचा गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी तुटलेल्या तारा लोंबकळणाऱ्या चारा तसेच वाकलेले पोल यामुळे विजेच्या पुरवठ्यात बिघाड होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळत आहे. सौ.उषाबाई हिराकांत मोहिते या ट्वेंटीवन साखर कारखान्याच्या सभासद असून कारखान्यास ऊस जाण्यासाठी विलंब लागत असल्याने सदरील महिला शेतकरी त्रस्त होत्या. त्यातच दिनांक 13 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्यामुळे हतबल झालेल्या महिला शेतकऱ्याने भादा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून या घटनेचा श्रीमती अंबिका जोगदंड तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments