महिला दिनानिमित्त राजयोग शिक्षण केंद्राच्या सुशिला बहेणजी यांचा सत्कार

 महिला दिनानिमित्त राजयोग शिक्षण केंद्राच्या सुशिला बहेणजी यांचा सत्कार


 औसा प्रतिनिधी

 आतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने औसा येथे प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयाच्या राजयोग शिक्षण केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सुशीला बहेणजी यांचा औसा येथील ज्ञांवर्धिनी महिला भजनी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राजे योगिनी, सुशीला बहेनजी यांनी सलग 40  वर्षापासून राज्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यामध्ये शैक्षणिक व सामाजिक जागृती तुन समाज प्रबोधनाचे अविरत कार्य केल्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये औसा येथील कुमारी देशमाने ही युक्रेन या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली असताना युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुखरूप आपल्या मायदेशी परतल्या मुळे या विद्यार्थिनीचा ही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. यावेळी ज्ञानवर्धिनी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा महानंदा कोपरे, सरोजनी कठारे, छाया कुलकर्णी ,भारत बाई औटी, सुमन बाई मुळे ,ब्रह्मकुमार धनंजय भाई यांच्यासह राज योग शिक्षण केंद्राचे ब्रह्माकुमार व ब्रह्माकुमारीज् यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments